गळफास घेवून शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:05 IST2018-10-06T01:05:23+5:302018-10-06T01:05:49+5:30
राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचाºयाचे नाव आहे. प्रवीण कांबळे अर्धापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते.

गळफास घेवून शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचा-याचे नाव आहे. प्रवीण कांबळे अर्धापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते.
४ आॅक्टोबरच्या रात्री त्यांनी राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. ते ज्ञानेश्वरनगर, सिडको येथे राहत होते. याप्रकरणी वडील सोपानराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. फौजदार गजानन पाटील व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
भुरटे चोर झाले उदंड
मुगट : येथील ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्चून सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आले होते. कालांतराने एलईडी बल्ब बसविण्यात आले. सौरऊर्जेच्या दिव्यांकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने त्यातील बॅटरी, खांब चोरीला गेले आहेत. पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यात आली नाही, हे विशेष!