शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

मताधिक्य द्या; विधानसभा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:32 AM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन दाखवा

ठळक मुद्देपक्षश्रेष्ठींचे निर्देश आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांची प्रचारात कसोटी

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन दाखवा, विधानसभेचे तिकीट निश्चित करण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होईल, असे स्पष्ट निर्देश देत नेतृत्त्वाची दुसरी फळीही कामाला लावली आहे़लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला वेग आला आहे़ काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण रिंगणात उतरले आहेत़ त्यांची लढत महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित आघाडीचे प्रा़ यशपाल भिंगे यांच्यासोबत होत आहे़ तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या पद्धतीने प्रचारात जोर लावला आहे़ विविध तालुक्यांतील आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे़ लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे़ या अनुषंगाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत आपल्या अस्तित्वासाठी प्रचारात झोकून दिले आहे़नांदेड लोकसभा मतदारसंघा- अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात़ नांदेड उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे असून तेथून डी़ पी़ सावंत प्रतिनिधित्व करीत आहेत़ तर दक्षिण मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़ येथून हेमंत पाटील निवडून आले होते़ मात्र हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली असल्याने शहरातील दक्षिणचीही ही जागा शिवसेनेसाठी मोकळी झाली आहे़ भोकर विधानसभा मतदारसंघातून अमिता चव्हाण काँग्रेसच्यावतीने प्रतिनिधित्व करतात़ तर नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसेच वसंतराव चव्हाण विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत़ देगलूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तेथे सुभाष साबणे तर मुखेड मतदारसंघ भाजपाकडे असून तेथून डॉ़तुषार राठोड २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत़या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ विद्यमान आमदारांचा आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न असणार आहे़ या अनुषंगानेच या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली आहे़ मात्र ज्या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेला आहे़ तेथे इच्छुकांची संख्या अधिक आहे़ याच ठिकाणाहून आगामी विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने या इच्छुकांनी जनसंपर्क वाढविल्याचे दिसून येते़ लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत़ या दहा दिवसांत प्रचारात कोण मेहनत घेतो याची नोंदही ठेवली जात असल्याने इच्छुकांसाठी हे दहा दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत़

  • भोकर मतदारसंघात भाजपाकडून डॉ़माधवराव किन्हाळकर, नागनाथराव घिसेवाड यांचा दांडगा जनसंपर्क आहे़ तेथे शिवसेनेकडून सतीश देशमुख यांच्यासह शिवाजीराव पाटील किन्हाळकर यांचीही नावे चर्चेत होती़
  • देगलूर-बिलोली मतदारसंघ शिवसेनेच्या सुभाष साबणे यांच्या ताब्यात आहे़ तेथे काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे नाव पुढे आहे़ तर भाजपाकडून धोंडिबा कांबळे यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते़
  • किनवट-माहूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आ़ प्रदीप नाईक करतात़ येथे भाजपाकडून अशोक पाटील सूर्यवंशी, शिवसेनेकडून ज्योतीबा खराटे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा़ हेमराज उईके प्रचारात आघाडीवर आहेत़
  • मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघ डॉ़तुषार राठोड यांच्या रुपाने भाजपाच्या ताब्यात आहे़ येथे काँग्रेसकडून हणमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि शेषराव चव्हाण यांनी प्रचारात जोर लावला आहे़ बालाजी पाटील कारलेकर यांनीही जनसंपर्क वाढविलेला आहे़
  • नायगाव-धर्माबाद-उमरी मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात आहे़ वसंतराव चव्हाण या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत आहेत़ या मतदारसंघात भाजपाकडून राजेश पवार आणि डॉ़मीनल खतगावकर यांच्यामध्ये चुरस आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब गोरठेकर, राजेश कुंटूरकर यांचेही या भागात मोठे प्राबल्य आहे़
  • नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून डी़ पी़ सावंत प्रतिनिधित्व करतात़ या मतदारसंघात मिलिंद देशमुख, बंडू पावडे हे भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत़
  • नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपाकडून दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत़ तर काँग्रेसकडून नरेंद्र चव्हाण,अब्दुल सत्तार हे प्रचारामध्ये अग्रभागी आहेत़
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेस