शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

आंतरराष्ट्रीय कलावंत जेठवाणींचे लिंग परिवर्तन; 'भरत' आता ओळखला जाणार 'सान्वी' नावाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:00 IST

धाडसी निर्णय घेत दिल्लीतील खासगी रुग्णालयात केली शस्त्रक्रिया

- श्रीनिवास भोसलेनांदेड : मुलगा म्हणून जगताना आपण स्त्री असल्याची भावना डॉ. भरत जेठवाणी यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी समाज, कुटुंब काय म्हणेल याचा विचार न करता धाडसाने लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याने आता 'भरत' हा स्त्रीच्या रूपात 'सान्वी जेठवाणी' या नावाने ओळखला जाणार आहे.

लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज मनात येत असलेल्यांना वैद्यकीय भाषेत जेंडर सायफोरिया असे संबोधले जाते. अशा व्यक्ती आपले लिंग परिवर्तन करून घेऊ शकतात, तसा त्यांना कायद्याने अधिकार दिला आहे. यास लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रिया (एसआरएस) असे म्हणतात. कायद्यासह लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेची माहिती घेऊन डॉ. भरत जेठवाणी यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली असून, त्यांनी आता सान्वी या नावाने आपल्या नवजीवनाची सुरुवात केली आहे. जेठवाणी ही नांदेडची पहिली परिवर्तीत महिला ठरली आहे.

तब्बल १८ तासांच्या सात सर्जरीलिंग परिवर्तनाची किचकट आणि अवघड शस्त्रक्रिया आहे. डॉ. जेठवाणी यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दोन टप्प्यांत शस्त्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात तब्बल ११ तास, तर दुसरी शस्त्रक्रिया वीस दिवसानंतर सहा तास चालली. एकूण १८ तासांमध्ये जेठवाणी यांच्यावर सात सर्जरी करण्यात आल्या.

समाजाची कायमच ऋणी, लग्नही करणार : सान्वीनांदेडकरांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने मला नेहमीच साथ दिली म्हणून मी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करू शकले. लिंग परिवर्तनानंतर समाज काय म्हणेल याचा मी जास्त विचार केला नाही. परंतु, ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली ते यापुढेही निश्चितच देतील. भूतकाळ अन् भविष्यकाळ स्वीकारणारा समजदार जोडीदार मिळाला तर निश्चितच लग्न करणार आहे. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होतील किंवा नाही, याची खात्री डॉक्टरांनादेखील नव्हती. परंतु, मी मोठ्या धाडसाने हा निर्णय घेऊन शस्त्रक्रिया केली. त्यात आज स्त्री म्हणून मी लग्नानंतर माझ्या जोडीदारास सर्वस्व देऊ शकते. मात्र, मला संतती प्राप्त होणार नाही. त्यामुळे जो कोणी मूल होणार नाही, ही बाब स्वीकारून लग्नास तयार झाला तर लग्नाचा विचार करेल.- डॉ. सान्वी जेठवाणी, कलावंत

दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये ललिताचा ललितकुमार...बीडच्या पोलीस दलात महिला म्हणून भरती झालेल्या ललिता साळवे यांनी शरीरातील हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला. नोकरीत असल्यामुळे त्यांना विविध परवानग्या घेऊन सदर शस्त्रक्रिया करावी लागली होती. लिंग बदलानंतर ललिताचा ललितकुमार होऊन त्यांनी सीमा यांच्यासाेबत संसार थाटला आहे.

लावणीवर डॉक्टरेटगेल्या अनेक वर्षापासून लावणीत वेगवेगळे प्रयोग करून पारंपरिक लावणीचा प्रसार भारतात आणि विदेशात केलेला आहे. लावणीसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील डॉ. जेठवाणी यांना प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने लावणी सम्राट, नृत्य शिरोमणी, भारतीय नृत्य रत्न आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जेठवाणी यांनी लावणीवरच पीएच. डी. देखील केलेली आहे.

टॅग्स :NandedनांदेडSex Changeलिंगपरिवर्तन