घरासमोर कचरा टाकला; रागात शेजाऱ्यांनी केला तरुणाचा खून

By शिवराज बिचेवार | Updated: October 1, 2022 19:00 IST2022-10-01T19:00:16+5:302022-10-01T19:00:16+5:30

घरासमोर कचरा आणि सांडपाणी सोडण्याच्या कारणावरून सुरु होते वाद

Garbage throws in front of the house; Neighbors killed the young man in anger | घरासमोर कचरा टाकला; रागात शेजाऱ्यांनी केला तरुणाचा खून

घरासमोर कचरा टाकला; रागात शेजाऱ्यांनी केला तरुणाचा खून

नांदेड : शहरातील आंबेडकर नगर भागात घरासमोरील कचरा आणि सांडपाण्याच्या कारणावरून वाद घालत सहा जणांनी एका युवकाला मारहाण करीत चाकूने भोसकले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी काही तासांतच सहाही जणांना अटक केली आहे.

यशपाल सोपानराव भिसे हा युवक शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभा होता. यावेळी शेजारीच राहत असलेल्या अमोल आनंदराव गोवंदे, किरण मारोती खंडेजोड, आनंद किशनराव गोवंदे, शिल्पा अमोल गोवंदे, वंदना आनंद गोवंदे, चांदणी आनंद खंडेजोड यांनी घरासमोर कचरा आणि सांडपाणी सोडण्याच्या कारणावरून यशपाल भिसे यांच्यासोबत वाद घातला. हा वाद एवढा टोकला गेला की, आरोपींनी धारदार शस्त्राने यशपाल यांच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशपाल यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात राहुल भिसे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोनि. डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे सपोनि. रवी वाहुळे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, शेख इब्राहिम, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे यांच्या पथकाने या प्रकरणातील सर्व आरोपींच्या काही तासांतच मुसक्या आवळल्या.
 

Web Title: Garbage throws in front of the house; Neighbors killed the young man in anger