१२.३५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:18 IST2021-03-05T04:18:28+5:302021-03-05T04:18:28+5:30
बिरादार सेवानिवृत्त मुक्रमाबाद : येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.के. बिरादार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात ...

१२.३५ लाखांचा निधी
बिरादार सेवानिवृत्त
मुक्रमाबाद : येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.के. बिरादार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामराव भोसले, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे बबन पाटील गोजेगावकर, प्रा. एस.एस. सज्जनशेट्टे, सरपंच अंजिता बोधणे, उपसरपंच सदाशिव बोयावार, सदस्य बालाजी पसरगे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली.
अवैध वाहतूक जोरात
देगलूर : शहरातील नवीन बसस्थानक व जुन्या बसस्थानकासह मुख्य बाजारपेठ परिसरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जुने बसस्थानक परिसरातून रामपूर, होट्टल, कुशावाडी, काठेवाडी, बल्लूर, गवंडगाव, करडखेड, मरखेल, हणेगाव, मुक्रमाबाद या गावांकडे किमान ३० ते ४० ऑटो ये-जा करतात, तसेच भायेगाव, राजूर, आंबुलगा आदी गावांकडेही मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. प्रवासी कोंबून भरले जातात.
रविदास महाराज जयंती
कामठा बु. : कामठा बु. येथे संत रविदास महाराजांची जयंती गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक रणजितसिंघ चिरागिया यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसरपंच रणजितसिंघ कामठेकर होते. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष व्यंकटेश दुधंबे, विश्वनाथ दासे, महंतअप्पा बरगळ यांची भाषणे झाली. मारुती अस्वले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला चंद्रकांत गव्हाणे, आबासाहेब निकम, संजय गव्हाणे, इरबा गुंजकर, रामदास साखरे, सतीश व्यवहारे, रमेश निकम, ईश्वर गव्हाणे आदी उपस्थित होते.
मंदिराचा वर्धापन दिन
मुखेड : शहरातील डॉ. हेडगेवार चौक येथे विनायक गणेश मंदिराचा १६ वा वर्धापन दिन ३ मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मंदिरात अभिषेक, पूजा, गणेश याग, महाआरती करण्यात आली. मंदिराचे मुख्य सत्यवान गरुडकर व सुरेश गरुडकर यांनी विधी केला. यावेळी भारत गरुडकर, चंद्रकांत गरुडकर, कालिदास कुलकर्णी, हरिहर देशमुख, अशोक वावधाने, अनंत महाराज जोशी, रमेश महाराज जोशी, अनिल महाराज जोशी आदी उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेला सुरुवात
नायगाव : बरबडा येथील ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. गावात साफसफाईमुळे अनेक समस्या निर्माण झाल्याने त्याची दखल ग्रामपंचायतीने घेतली आणि स्वच्छता मोहीम राबवणे सुरू केले. सरपंच माधव कोलगाणे, उपसरपंच छाया धर्माधिकारी व सर्व सदस्य याकामी पुढाकार घेत आहेत.
जाधव यांना पदोन्नती
लोहा : मूळचे सावरगाव (न.) अंतर्गत सक्रू तांडा येथील तुकाराम जाधव यांना पोलीस निरीक्षकपदावर पदाेन्नती मिळाली. २००९ मध्ये पीएसआय म्हणून ते भरती झाले होते. एमपीएससीमार्फत यांची ही निवड झाली. यादरम्यान वणी, उमरखेड, नरसी नामदेव, हट्टा, वसमत, रामतीर्थ, आर्थिक गुन्हे शाखा नांदेड येथे त्यांनी काम केले.
२६ वर्षीय इसमाची आत्महत्या
हदगाव : मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपरखेड येथील एका २६ वर्षीय तरुणाने मोबाइल टॉवरच्या खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. विजय गोविंद ससाणे, असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मनाठा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
मामडगे यांना पीएच.डी.
मुखेड : धर्मापुरी येथील कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. पांडुरंग मामडगे यांना स्वा.रा.ती.म. विद्यापीठाने इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान केली. ‘प्लेटोनिझम इन द पोएट्री ऑफ वर्डस्वर्थ, शेले ॲन कीटस् अ रीअसेसमेंट’ या विषयावरील प्रबंध त्यांनी डॉ. क्रांती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडे दाखल केला होता.