मुखेडात संविधान प्रेमींचा एल्गार, भर पावसात तिव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 19:05 IST2018-08-17T19:05:40+5:302018-08-17T19:05:52+5:30

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्त आज सकाळी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सर्वपक्षीय व सर्वजातीय संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

In front of the Constitution, lover of elation, intense demonstrations | मुखेडात संविधान प्रेमींचा एल्गार, भर पावसात तिव्र निदर्शने

मुखेडात संविधान प्रेमींचा एल्गार, भर पावसात तिव्र निदर्शने

मुखेड ( नांदेड ) : दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्त आज सकाळी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सर्वपक्षीय व सर्वजातीय संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. 

आंदोलनात माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, जि.प. सदस्य दशरथ लोहबंदे, आर.पि.आय.चे जिल्हाध्यक्ष गौतम काळे, सदाशिव पाटील, रासप तालुका अध्यक्ष डॉ. रामराव श्रिरामे, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड,  नगरसेवक ऊत्तम बनसोडे, श्रावण नरबागे,डॉ. श्रावण रॅपनवाड,  शिवाजी गेडेवाड, माजिद हाफिज, कॉ.विनोद गोविंदवार, रियाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलकांनी पोलिस उपअधिक्षक रमेश सरवदे व पोलिस निरिक्षक सुभाष राठोड यांना निवेदन सादर केले. 

Web Title: In front of the Constitution, lover of elation, intense demonstrations