शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सत्तेसाठी मित्राची लाचारी वेदनादायी; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 1:44 PM

शिवसेना ही यापूर्वी संविधानाप्रमाणे काम करीत नव्हती किंवा सत्तेसाठी लाचार झाली हे दोन मुद्दे असू शकतात़

ठळक मुद्देनांदेड येथील कार्यकर्ता मेळावा  

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्ता स्थापन करण्यापूर्वी संविधानानुसार काम करणार असे पत्र घेऊन सोनियांकडे गेले होते काय? सोनियाजींना ते पत्र देऊन मला मुख्यमंत्री करा, अशी विनवणी त्यांनी केली आहे काय? याचे उत्तर शिवसेनेने द्यायला हवे़ असे असल्यास सत्तेसाठी मित्राची ही लाचारी वेदनादायी असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला़ दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ता स्थापनेपूर्वी शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे वक्तव्य केले होते़ 

नांदेडात चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी संविधानाप्रमाणे काम करू, असे जर लिहून दिले असेल तर शिवसेना ही यापूर्वी संविधानाप्रमाणे काम करीत नव्हती किंवा सत्तेसाठी लाचार झाली हे दोन मुद्दे असू शकतात़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार तीनचाकी रिक्षा असल्याचे म्हणत आहेत़ रिक्षा हे गरिबाचे वाहन आहे़ त्याबद्दल आदरच आहे़ परंतु रिक्षाने नांदेडवरून मुंबईला जाता येत नाही़ त्यासाठी बुलेट ट्रेनच लागते़ कारण रिक्षाला मर्यादा आहे़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची भूमिका घेतली होती़ बाळासाहेबांच्या याच भूमिकेशी आत्ताची शिवसेना सहमत आहे काय याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. अशोकराव चव्हाण हे चिखलीकर यांना धन्यवाद देत असतील़ कारण लोकसभेत पराभवानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले़ परंतु त्यांचा हा आनंद फार दिवस टिकणार नाही़ या सरकारला जनतेशी काहीएक देणेघेणे नसून आजपर्यंत कमावलेला पसारा सांभाळण्यासाठी त्यांना सत्ता गरजेची आहे़ या सरकारचे खायचे, दाखवायचे आणि बोलायचे दात वेगळे असल्याचे ते म्हणाले.

शिवभोजन थाळीमुळे गरिबांची थट्टामोठ्या थाटात शिवभोजन थाळीला प्रारंभ केला. गरिबांना १० रुपयांत जेवण अशी प्रसिद्धी केली. परंतु नांदेड जिल्ह्याचा विचार करता दरदिवशी फक्त ५०० लोकांना जेवण मिळणार आहे़ त्यासाठीही आधार कार्ड, वेळेचे बंधन पाळावे लागेल. गुरुद्वारा येथे दररोज हजारो भुकेल्यांना लंगरमध्ये जेवण दिले जाते़ ही शिकवण आमच्या गुरुंची आहे़  शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरिबांची थट्टा मांडण्याचा आरोप फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकार