Four accused in shooting case arrested | गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक

गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक

नांदेड : शहरातील महाराजा रणजितसिंहजी मार्केट भागात तीन दुकानावर गोळीबार केल्याची खळबळजन घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.

शनिवारी सायंकाळी जुना मोंढा भागात दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी अवघ्या दहा मिनिटांत तीन दुकानांवर तब्बल सात गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात आकाश परिहार हा पान टपरी चालक जखमी झाला होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सकाळी आणखी दोघांना पकडण्यात आले. तर मुख्य आरोपी असलेले दोघे फरार आहेत. लुटमारीसाठीच गोळीबार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर नेमके कारण स्पस्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी दिली. 

 

 

Web Title: Four accused in shooting case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.