माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:01 IST2025-01-01T11:00:58+5:302025-01-01T11:01:15+5:30

शरद पवारांच्या विश्वासू माजी आमदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Former MLA of Kinwat Mahur assembly constituency Pradeep Naik passes away | माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

नितेश बनसोडे

माहूर (नांदेड): किनवट -माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेते, राजकारणातील अजात शत्रू व्यक्तिमत्त्व असलेले माजी आमदार प्रदीप नाईक (वय ६८ वर्ष) यांचे हैद्राबाद येथे आज १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  

प्रदीप नाईक हे १९९९ ला राजकारणात सक्रिय झाले आणि त्यानंतर १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी पहिली किनवट विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर संपर्क कायम ठेवत प्रथम २००४ साली किनवट -माहूर विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले. त्यानंतर सण २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१९ या काळात सलग तीन वेळा किनवट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून विजयाची हँट्रिक साधली होती. 

त्यानंतर २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत प्रदीप नाईक पराभूत झाले. प्रदीप नाईक हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू होते. मागील काळात अनेक राजकीय घडामोडीतील सारीपाठाच्या खेळातही शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून राजकारणात सक्रिय होते. सर्व समावेशक व हसत मुख व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्याच्या कार्यकाळात किनवट -माहूर विधानसभा मतदार संघात विकासाला चालना दिली. त्यांच्या निधनाने फार मोठी राजकीय हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी दहेली तांडा ता.किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 

Web Title: Former MLA of Kinwat Mahur assembly constituency Pradeep Naik passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड