शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'फोटोजीवी' कार्यकर्त्याच्या स्टेजवर उचापती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दाखवली जागा

By सुमेध उघडे | Updated: November 4, 2022 18:05 IST

माजी मुख्यमंत्री आ. अशोल चव्हाण यांचे भाषण सुरु होताच पांढरे कपडे घातलेला एक कार्यकर्ता हळूच स्टेजवर आला.

नांदेड : माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमातील एका 'व्हायरल व्हिडीओ'ची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. चमकोगिरी करत उचापती करणाऱ्या कार्यकर्त्यास आ. चव्हाण यांनी स्टेजवरच झिडकारल्याचे व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत आहे. केवळ फोटोसाठी काही कार्यकर्ते कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही अशीच चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकहाती कॉंग्रेसचे वर्चस्व टिकवून ठेवले आहे. मागे झालेल्या देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रसच्या उमेदवारास निवडून आणत त्यांनी जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध केले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात व्यस्त आहेत. यातच आ. चव्हाण यांचा २८ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस होता. यानिमित्त मुदखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात आ. चव्हाण यांनी हजेरी लावली होती. 

यावेळी स्वागताला उत्तर देण्यासाठी आ. चव्हाण बोलण्यास उठले. त्यांनी भाषण सुरु केले याचवेळी पांढरे कपडे घातलेला एक कार्यकर्ता हळूच स्टेजवर आला. हळूच तो आ. चव्हाण यांच्या मागे जाऊन उभा राहिला. हे लक्षात येताच आ. चव्हाण यांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले. तर तो कार्यकर्ता थोडेस बाजूला झाला. तेव्हा पुन्हा आ. चव्हाण यांनी पाहताच एक निवेदन देण्याचा प्रयत्न करू लागला. भर कार्यक्रमात भाषण सुरु असताना नसती उठाठेव करणाऱ्या या कार्यकर्त्यास मात्र यानंतर आ. चव्हाण यांनी झिडकारत तेथून बाजूला होण्याचा इशारा केला. आगंतुकपणा करणारा हा कार्यकर्ता काही झालेच नाही या आविर्भावात तेथून बाजूला झाला. मात्र, या सर्व प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भविष्यातही 'फोटोजीवी' कार्यकर्त्यांना बाजूला सारून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आ. चव्हाण न्याय देतील अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNandedनांदेड