शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video: धावत्या रेल्वेत चढणे चौकीदाराच्या अंगलट; पाय तुटला, उपचारास नेताना मृत्यू

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 23, 2023 18:30 IST

धावत्या रेल्वेत चढत असताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय घसरल्याने झाला अपघात

- गोकुळ भवरेकिनवट : आदिलाबाद ते नांदेड या धावत्या इंटरसिटी गाडीत किनवट रेल्वे स्थानकातून चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीरमेटी येथील महेश कनाके यांचा पाय घसरल्याने रेल्वेखाली आल्याची घटना आज सकाळी ९.४५ वाजता घडली. यात डावा पाय तुटून गंभीर जखमी झालेल्या महेशचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, धावत्या रेल्वेत चढतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

महेश (महेंद्र) कनाके हा सिरमेटी येथील असून, तो किनवट येथे राहायला आहे. तो वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग किनवट येथे चौकीदार म्हणून कार्यरत आहे. तो २३ ऑगस्ट रोजी सकाळी किनवट येथून नांदेडला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला. आदिलाबाद ते नांदेड या इंटरसिटीने नांदेडला जाण्यासाठी किनवट येथून धावत्या रेल्वेत चढत असताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय घसरला. दोन-तीन पलट्या मारून तो रेल्वेखाली आला. सुदैवाने जीव वाचला. मात्र, त्याचा डावा पाय तुटला. उजव्या पायालाही मार लागून डोक्यालाही दुखापत झाली.

महेशला जखमी अवस्थेत गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.आर.एस. ढोले यांनी उपचार केला. दरम्यान, आदिलाबाद येथून नागपूरला उपचारासाठी नेताना पांढरकवडा नजीक वाटेतच दुपारी ३ च्या सुमारास महेश कनाकेची  प्राणज्योत मालवली अशी माहिती आहे.

टॅग्स :Nandedनांदेडforestजंगलrailwayरेल्वेAccidentअपघात