First prize for 'blue hat' play from Nanded center | नांदेड केंद्रातून ‘निळी टोपी’ नाटकास प्रथम पारितोषिक 
नांदेड केंद्रातून ‘निळी टोपी’ नाटकास प्रथम पारितोषिक 

ठळक मुद्देराज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी

नांदेड : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जाहीर करण्यात आला़ या स्पर्धेत नांदेडच्या ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेल्या ‘निळी टोपी’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावित बाजी मारली आहे़ द्वितीय पारितोषिक परभणी येथील मंडळाने सादर केलेल्या ‘सृजनमयसभा’ या नाटकाला जाहीर झाले असून, या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे़

येथील कुसूम सभागृहात १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही प्राथमिक फेरी पार पडली़  या स्पर्धेत १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्यसंचालक विभीषण चवरे यांनी जाहीर केला़ द्वितीय पारितोषिक बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणी या संस्थेच्या सृजनमयसभा  या नाटकासाठी  जाहीर करण्यात आल्याने ‘निळी टोपी’ व ‘सृजनमयसभा’ ही दोन्ही नाटके अंतिम फेरीत पोहोंचली आहेत़ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील नटराज कला विकास मंडळ या संस्थेच्या ‘वाडा’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

दरम्यान, दिग्दर्शनासाठीचे प्रथम पारितोषिक ‘निळी टोपी’ नाटकाचे दिग्दर्शक राहुल जोंधळे यांना मिळाले तर द्वितीय पारितोषिक  रविशंकर झिंगरे यांना ‘सृजनमय सभा’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी जाहीर करण्यात आले़ प्रकाशयोजना : प्रथम पारितोषिक नारायण त्यारे (नाटक: निळी टोपी) द्वितीय पारितोषिक : सुधीर देऊळगावकर (नाटक : सृजनमय सभा), नेपथ्य : प्रथम पारितोषिक स्नेहल पुराणिक (नाटक : सृजनमय सभा), द्वितीय पारितोषिक दत्ता चव्हाण ( नाटक: वाडा ) रंगभूषा : प्रथम पारितोषिक तेजस्विनी देलमाडे (नाटक: अंधार यात्रा) द्वितीय पारितोषिक ज्योतिबा हनुमंते (नाटक निळी टोपी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक :अतुल साळवे (नाटक: वाडा) व स्वाती देशपांडे (नाटक: कळा या लागल्या जीवा) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र : पूर्वा देशमुख (नाटक : जादू तेरी नजर) सुनंदा डीघोळकर  (नाटक: वाडा) नीलिमा चितळे (नाटक: अंधारयात्रा) आरती नीळगिरकर (नाटक: मत्स्यगंधा) हिमानी होटकर (नाटक: नजरकैद) नाथा चितळे (नाटक: अंधार यात्रा) अमोल जैन (नाटक: द कॉन्श्न्स ) किशोर पुराणिक (नाटक: सृजनमयसभा) चंद्रकांत तोरणे (नाटक: निळी टोपी) आणि नजरकैद नाटकासाठी मिलिंद चन्ने यांना गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले़ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, प्रमोद काकडे आणि प्रकाश खोत यांनी काम पाहिले तर समन्वयक म्हणून दिनेश कवडे, सह समन्वयक किरण टाकळे, गौतम गायकवाड, अभिषेक दाढेल, मोहन कवटगी, कुलदीप इंगळे यांनी मेहनत घेतली. 

Web Title: First prize for 'blue hat' play from Nanded center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.