नांदेडमधील तेहरानगर येथे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:47 IST2019-02-05T17:31:44+5:302019-02-05T17:47:55+5:30
नांदेड : शहरातील तेहरा नगर भागात आज दुपारी ईमारत न. A - 6 मध्ये दुसऱ्या मजल्यावरील घरात आग लागली. ...

नांदेडमधील तेहरानगर येथे घराला आग
नांदेड : शहरातील तेहरा नगर भागात आज दुपारी ईमारत न. A - 6 मध्ये दुसऱ्या मजल्यावरील घरातआग लागली. यात घरातील सामानाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून रोख रक्कम व दागिने सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले आहे.
शंकरराव चव्हाण नगरी येथील ईमारत न. A - 6 मध्ये दुसऱ्या मजल्यावरील घरात आज दुपारी अचानक आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने बाजूच्या इमारतींवरून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यानंतर घरात असलेले स्वयपाकाचे सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी मोठी दुर्घटना टळली. तसेच घरातील अंदाजे ३ तोळे सोने व १५ ते २० हजाराची रोख रक्कम सुरक्षित बाहेर काढण्यात आली. मात्र आगीत घराचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून संपूर्ण साहित्य साहित्य जळून खाक झाले आहे.
पहा व्हिडीओ :