ऐन दिवाळीत जनरल स्टोअरला आग; लाख रुपयांच्या वर नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:37 IST2025-10-23T12:36:46+5:302025-10-23T12:37:37+5:30
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही...

ऐन दिवाळीत जनरल स्टोअरला आग; लाख रुपयांच्या वर नुकसान
देगलूर (जि. नांदेड ) : शहरातील लोहिया मैदाना येथील एका जनरल स्टोअर्सला ऐन दिवाळीत भीषण आग लागली. आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजले नाही नुकसानीचा अंदाज नाही.
देगलूर शहरातील लोहिया मैदान हनुमान मंदिराच्या बाजूस असलेल्या तिवारी जनरल स्टोअर्सचे मालक गंगाकिशन बन्सीलाल तिवारी हे १९७८ पासून जनरल स्टोअर्स व्यवसाय करत आहेत. त्यांच्या जनरल स्टोअर्सला बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आग लागली.
आग लागल्याचे कळताच शेजाऱ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने कळविले. अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. अग्निशामक विभागाच्या जवानांनी तत्परता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नसता आजूबाजूच्या दुकानांनाही व घरांनाही आग लागली असती.
ऐन दिवाळीच्या सणात ही दुर्घटना घडल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले.
लाखांच्यावर झाले नुकसान...
स्टोअरला लागलेल्या आगीत लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु नेमके किती नुकसान झाले हे मात्र कोणीही सांगू शकत नाही. घटना रात्री घडली असली तरी अजूनपर्यंत तरी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत गुन्हा नोंद करण्यात आला नाही. दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना ही घटना घडल्यामुळे परिसरातील ठिकाण मधून हळहळ व्यक्त होत आहे.