अखेर आसना पूल ते वारंगा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:45+5:302020-12-30T04:23:45+5:30

आसना ते वारंगा रस्त्यावरील खड्डे आणखी किती बळी घेणार, हे खड्डे बुजविण्याकरिता कोणता दिवस उजडणार, असे अनेक प्रश्न नागरिकांना ...

Finally repair of potholes on the road from Asana Bridge to Waranga | अखेर आसना पूल ते वारंगा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती

अखेर आसना पूल ते वारंगा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती

आसना ते वारंगा रस्त्यावरील खड्डे आणखी किती बळी घेणार, हे खड्डे बुजविण्याकरिता कोणता दिवस उजडणार, असे अनेक प्रश्न नागरिकांना व प्रवाशांना पडले होते.

आसना-अर्धापूर-पार्डी-वारंगा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. बातमीच्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या आसना-अर्धापूर-पार्डी-वारंगा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे; मात्र मोठमोठे खड्डेच बुजविण्यात येत आहेत. लहान खड्डे सोडून दिले जात आहे. या रस्त्यावरील वर्दळ पाहता लहान व मोठे खड्डेही बुजविण्यात यावे. या रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने लहान खड्डेही काही दिवसानंतर मोठे होतील आणि आणखी अपघात वाढतील, असे नागरिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. खड्डे बुजविताना लहान व लेव्हल काढणे आवश्यकता आहे. लेव्हल काढली नाही तर बुजविलेला खड्डा वाहनांच्या रहदारीने मोठा होऊन पुन्हा मोठा खड्डा तयार होईल आणि अपघात वाढेल. याकरिता शासनाने याकडे लक्ष द्यावे.

Web Title: Finally repair of potholes on the road from Asana Bridge to Waranga