शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:55 IST

शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना जाहीर समर्थन देणारे त्यांचे ‘दाजी’ तथा माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी मेहुण्याची साथ सोडली आहे. त्यांनी कार्यकर्ता बैठकीत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची घोषणा केली.

गुरुवारी शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या बहिणीचे पती माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही दिवसांतच अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले. तद्नंतर खतगावकर यांनीदेखील अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणे पसंत केले.

परंतु लोकसभा निवडणुकीत खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देऊन खतगावकर यांना विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले. पण तिथेही डावलण्यात आले. २०१९ मध्येही उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज होते. दरम्यान, गुरुवारच्या बैठकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची आणि डॉ. मीनल खतगावकर यांना नायगावमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल, अशी घोषणा केली.

भाजपकडूनही ऑफरदिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर भाजपने दिली. पण ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे ऑफर नाकारली. नांदेड लोकसभेवर चव्हाण कुटुंबीयांचाच अधिकार असून, पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना माझा पाठिंबा राहील, असे खतगावकर यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये धुसफूसखतगावकर हे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता थेट हायकमांडकडून प्रवेश घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खतगावकर यांच्या प्रवेशाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष हनमंत बेटमोगरेकर म्हणाले, खतगावकर हे काँग्रेसमध्ये पक्ष वाढविण्यासाठी येत असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत करू.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेडvidhan sabhaविधानसभा