बाईक-ट्रक धडकेत पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:29 IST2019-01-11T20:29:12+5:302019-01-11T20:29:45+5:30
यात बाईकवरील पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे.

बाईक-ट्रक धडकेत पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
लोहा (नांदेड ) : देड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक पिता-पुत्र जात असलेल्या बाईकला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली. यात बाईकवरील पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली.
तालुक्यातील डेरला येथील संभाजी गंगाराम सालकमवाड (वय 60) व रामकिशन संभाजी सालकमवाड (वय 30) हे दोघे पिता-पुत्र बाजार व खाजगी कामानिमित्त सोनखेडला आले होते. यानंतर ते दोघे बाईकवरून (MH 26 BG 9418) गावाकडे परतत होते. या दरम्यान, खरबी पाटीनजीक नांदेडवरून लातुरकडे भरधाव वेगात जाणा-या मालवाहु ट्रक ( क्र. MH 24 J 8795) त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात संभाजी सालकमवाड जागीच ठार झाले तर रामकिशन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सोनखेड पोलिस ठाण्याचे सपोनि बालाजी बंडे, पोलिस नाईक प्रकाश साखरे, पोकाँ. गुरूनाथ कारामुंगे, राजेश मुंडे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.