सततच्या नापिकीने शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:29 IST2022-11-19T18:28:58+5:302022-11-19T18:29:15+5:30
कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्याने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सततच्या नापिकीने शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले जीवन
हदगाव ( नांदेड) : सततच्या नापिकीमुळे उत्पन्न नाही. यामुळे मुलीच्या लग्नाचे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत टोकाचे पाऊल उचलत बरडशेवाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आज पहाटे स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू उत्तमराव पोले (४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच मनाठा स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक चिट्टेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मधुकर पवार, पोकॉ आनंद वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्याने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.