इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:13 AM2018-11-15T00:13:23+5:302018-11-15T00:14:54+5:30

शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़

The farmers of Isappur water the tahsil on Dadkale | इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

Next
ठळक मुद्देपैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीशेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नआम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाने वाहती राहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे़ यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकदा मागणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़
नदीकाठावरील गावकºयांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली़ यंदा वरिष्ठ पातळीवर पाणी भरपूर झाल्याने इसापूर धरण ७० टक्के भरले आहे़ त्यासाठी पाणी सोडून संबंधित भागातील बंधारे भरून देण्यात यावे, आम्ही नदीकाठावरील सर्व जनता दरवर्षी पाण्यासाठी मागणी करत असतो़ परंतु कार्यालयातील अधिकारी हे तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे सांगून पाण्यासाठी आलेल्यांवर अन्याय करीत आहेत़ जेव्हा इसापूर धरण भरले की नदीकाठावरील आम्हा शेतकºयांना सावधानतेचा इशारा देवून नदीपात्रात पाणी सोडतात़ यावेळी आमच्या शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान होते़ आणि पाण्याच्या त्यांच्या काळात आम्ही पाणी मागितले की आम्हाला पाणी देता येणार नाही, असे कारण सांगितले जाते़ पाणी जास्त सोडून आमच्यावर अन्याय आणि मागण्यासाठी आले तरीही आमच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे़ ज्या लोकांचे नुकसान होत नाही, अशांना कालवे खोदून कोट्यवधींचा निधी खर्चून लाभक्षेत्रात घेवून पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून आम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे़ आम्ही शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीकर भरत असतानाही अन्याय केला जात असेल तर आम्ही सहन करणार नाही़ त्यामुळे नदीकाठावरील शेतकºयांच्या सिंचन व पाणीप्रश्नाकडे लक्ष देत शासनाने ठरविलेल्या दोन कालव्याप्रमाणे तिसरा कालवा पैनगंगा नदीस घोषित करून पाणीपाळ्याप्रमाणे नियमित पाणी देण्यात यावे, जर आगामी आठ दिवसांत पैनगंगा नदीत वारंग टाकळी येथील शेवटच्या टोकापर्यंत पाणी नाही सोडले तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल, याची सर्व जबाबदाी प्रशासनावर राहील, वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असा इशाराही देण्यात आला़
सदर निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा़ राजीव सातव, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ़ नागेश पाटील, जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे़ या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, कृउबाचे सभापती गजानन तुप्तेवार, सुभाष राठोड, मदनराव पाटील, राजू पाटील भोयर, आबाराव पाटील, बळीराम देवकते, डॉ़ वानखेडे, किशनराव वानखेडे, नारायण पाटील, रामराव पाटील, विष्णु जाधव, अवधूतराव शिंदे आदींच्या सह्या आहेत़

Web Title: The farmers of Isappur water the tahsil on Dadkale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.