शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रुमालाने गळा आवळून शेतमजुराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 1:04 PM

पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत बाजूच्या झुडपात लपवून ठेवले.

ठळक मुद्देया प्रकरणी एका महिलेसह दोघांना संशयावरून अटक

उमरी (जि. नांदेड ) : उमरी  पोलीस स्टेशन हद्दीतील बल्लाळ ता. भोकर येथे  एका मजुराचा शेतामध्येच गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारुती गंगाधर गाडेकर ( ३४ ) असे मृताचे नाव आहे. ते सोमवारी ( दि. ६ ) रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी ही घटना उघडकीस आली.  

याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती गाडेकर हे गावातीलच मोहन रामराव श्रीखंडे यांच्या शेतामध्ये मजुरीने  काम करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी मारुती यांच्या अंगावरील रुमालाने त्यांचा गळा आवळून त्यास ठार केले.  तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत बाजूच्या झुडपात लपवून ठेवले. याप्रकरणी शेतमालक मोहन श्रिखंडे  यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी एका महिलेसह दोघांना संशयावरून उमरी पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे  हे पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी ७  जुलै रोजी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडMurderखून