सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 19:01 IST2021-10-28T19:00:22+5:302021-10-28T19:01:09+5:30
farmer suicide : ४० वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला

सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड: शेतीतील सततच्या नापिकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या इंजेगाव (ता. जि. नांदेड) येथील ४० वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान (farmer suicide ) मृत्यू झाला. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी विष्णूपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेगाव (ता. जि. नांदेड) येथील शेतकरी संतोष लक्ष्मण ठोके यांनी शेतीतील सततच्या नापिकीला तसेच बँकेच्या कर्जाला कंटाळून १९ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले. दरम्यान, संतोष ठोके यांना उपचारासाठी विष्णुपूरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, डॉक्टरांनी अखेर २३ ऑक्टोबर रोजी संतोष ठोके यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. परमेश्वर कदम व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली.
याप्रकरणी माधव लक्ष्मणराव ठोके (रा. इंजेगाव ता. जि. नांदेड) यांनी दिलेल्या माहितीचेआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात २७ ऑक्टोबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. माणिक हंबर्डे हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.