शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून नांदेडात बोगस खते; छाप्यात २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चाैघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:48 IST

मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतरीत्या खताची विक्री करण्याचे धाडस कोणाच्या मदतीशिवाय करणे शक्य नाही.

हिमायतनगर : तेलंगणा राज्यातून विविध कंपनीचे बोगस खते आणून ते विनापरवाना विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकून २२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तेलंगणातील तीन व हिमायतनगर येथील एकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एका गोदामात बोगस खतांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी गंगाधर भदेवाड यांना मिळाली. त्यानंतर २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस असलेल्या सरदार सॉ-मिलजवळ पत्र्याच्या टिनशेडमध्ये छापा टाकला. यावेळी खुशी क्रॉप केयर कंपनीचे खते बोलेरो पिकअप (एमएच २६ बीई ३२९५) या वाहनातून विक्री करताना आढळून आले. संबंधितांकडे खत विक्री परवाना, उगम प्रमाणपत्र तसेच कंपनी अधिकाऱ्याचे नाव व इतर कागदपत्रे आढळून आली नाहीत. तेलंगणा राज्यात निर्मित केलेले ७ लाख ५९ हजार ४७२ रुपये किमतीचे खत गोडावूनमधून अनधिकृतपणे, विनापरवाना बोलेरो गाडीतून नेले जात होते.

कृषी अधिकारी भदेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी करूपल्ली व्यंकण्णा (वय ४२, रा. मरली चमकोणिबावी), गुराम पोडे मंडल (रा. वटीकोडे, नालागोंडा), प्रवीण व्यंकय्या आडेप्पू (२२, रा. नालागोंडा), मलेश सत्यनारायण बोडला (३५, रा. हैदराबाद), ख्वाजा नसीर ख्वाजा वजीर (४२, रा. भोकर, हल्ली मुक्काम हिमायतनगर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमोल भगत करीत आहेत.

राजकीय नेत्याचा वरदहस्तशहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतरीत्या खताची विक्री करण्याचे धाडस कोणाच्या मदतीशिवाय करणे शक्य नाही. त्यामुळे यामागे मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत येथील कृषी व्यापारी संघटनेने व्यक्त केले आहे. हा गोरखधंदा चालवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला, तरी या धंद्याला अभय देणाऱ्या ‘आका’चा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्गातून केली जात आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कृषी व्यापारी तळ ठोकून होते. दरम्यान, जप्त केलेला बोगस साठा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या गोदामात होता.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी