शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कारखान्याचे बॉयलर पेटले; वाड्या, तांडे पडताहेत ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 6:45 PM

उसाचे उत्पादन चांगले असल्यामुळे ऊसतोड कामगारांसह मजुरांनाही यंदा कारखान्यांवर काम मिळणार आहे. 

ठळक मुद्देकुटुंबियांकडून निरोप, मजूर कारखान्याकडे रवाना

बारूळ : जिल्ह्यासह परजिल्ह्यांमधील कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने तालुक्यातील बारूळ परिसरातील मजुरांना ऊसतोडीचे वेध लागले आहेत. वाडी, तांड्यांवरील कामगार ऊसतोडीला निघाल्याने वस्त्या, वाडी, तांडे, गावे आता ओस पडू लागली आहेत. दरम्यान, या कामगारांना निरोप देताना कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत.

गेल्यावर्षी परतीच्या दमदार पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे मजूर आर्थिक अडचणीत सापडले होते, तर यंदा अति पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टाकलेला खर्चही घरात न आल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. मात्र, उसाचे उत्पादन चांगले असल्यामुळे ऊसतोड कामगारांसह मजुरांनाही यंदा कारखान्यांवर काम मिळणार आहे. 

तालुक्यात साखर कारखाना नसल्यामुळे बारूळ, बाचोटी, हळदा, धर्मापुरी, चिंचोली, तेलूर, राहाटी, दहिकळंबा, मंगल सांगवी, औराळा, चिखली, काटकळंबा, पेठवडज, परिसरातील मसलगा नारनाळी, येलूर, वरवट  वाडी, तांडे यासह अन्य गावांतील ऊसतोड मजुरांना दरवर्षी  जिल्ह्यातील  कुंटूर कारखाना,  बाऱ्हाळी  कारखाना,  वागलवाडा कारखाना, शिवडी कारखाना यासह परजिल्ह्यांतील  लातूर, अंबाजोगाई, परभणी  येथील  कारखान्यांमध्ये ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला असल्याने  बारूळ परिसरासह अनेक गावांतील वाडीत तांड्यावरील ऊस कामगार ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. तालुक्यातील  मजूर परजिल्ह्यांतील ऊसतोडणीसाठी जात आहेत. दररोज ५ ते १० ट्रक,  ट्रॅक्टरमधून  जाताना दिसत आहेत.  

कुटुंबियांकडून निरोप, मजूर कारखान्याकडे रवानावर्षभरातील पाच ते सहा महिने ऊसतोडणीतून मजुरी मिळते. उर्वरित कालावधीत हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. ऊसतोडणीसाठी न गेल्यास संसाराचा गाडा हाकायचा कसा, हा प्रश्‍न उपस्थित राहत असल्याचे हळदा येथील ऊसतोड मजुरांनी सांगितले. वर्षभरातील जवळपास पाच महिने गावी राहत नसल्याचेही ते म्हणाले.  ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक घरातील मोठ्या व्यक्तींना हे काम करावे लागते. त्यामुळे लेकरांना सोडायचे कुठे, हा प्रश्न निर्माण होत असतो.  संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन उसाच्या फडात दाखल होत आहे. लेकरांचे शिक्षण कोरोनामुळे झालेच नाही. पुढेही काय परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित ठरवता येत नसल्यामुळे सोबत लेकरांना घेऊन आलो, असे अनेक मजुरांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने