शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जलपुनर्भरणाच्या कामाने राज्यात शेतकऱ्यांचे अकालमृत्यू थांबतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:56 IST

कधीकाळी भारतात महाराष्ट्र हे विकासाबाबतीत नंबर एकचे राज्य होते. पण आज दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येत आपण एक नंबरवर गेलो आहोत़

ठळक मुद्देपावसाच्या पाण्याची कमतरता नाही पण त्याचे नियोजन, पुनर्भरण, साक्षरता याची कमतरता आहे. जलसाक्षरतेमुळे मराठवाडा विभागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट होईल

नांदेड : तिसरे महायुद्ध रोखावयाचे असेल तर जलसाक्षरता आवश्यक आहे. दिवसेंदिवस शिक्षण आणि ज्ञानामधील दरी वाढत आहे. पण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे शिक्षणाबरोबरच ज्ञानही देत आहे. विद्यापीठाने हाती घेतलेले जलपुनर्भरणाचे काम अकालमृत्यू रोखणारे आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले़ 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ‘तिसऱ्या महायुद्धाचे समाधान: जलसाक्षरता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, ऊर्ध्व पैनगंगेचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, डॉ. अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ़ राणा म्हणाले, कधीकाळी भारतात महाराष्ट्र हे विकासाबाबतीत नंबर एकचे राज्य होते. पण आज दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येत आपण एक नंबरवर गेलो आहोत़ विद्यापीठ हे समाजासाठी एक आदर्श असते. विद्यापीठामधूनच समाजातील तळागाळापर्यंत विविध प्रोत्साहित बाबी पोहोचत असतात. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकाराने जलसाक्षरतेद्वारे जलपुनर्भरणाचे जे कार्य झालेले आहे ते कौतुकास्पद आहे़  मराठवाडा हा विभाग बऱ्याच प्रमाणात दुष्काळप्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाच्या पाण्याची कमतरता नाही पण त्याचे नियोजन, पुनर्भरण, साक्षरता याची कमतरता आहे. येथे पडलेल्या पावसाच्या सरासरी प्रमाणामध्ये आमच्या भागात २५ टक्केच पाऊस पडतो. पण आम्ही समाजाला जलसाक्षर करून दुष्काळावर मात केली आहे. आज विद्यापीठामध्ये जे काही जलसाक्षरतेवर कार्य होत आहे. ते येथे आलेल्या चारही जिल्ह्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयात, गावात, घरी याबद्दल माहिती द्यावी आणि जलसाक्षरतेचे काम हाती घ्यावे, असे आवाहन डॉ़ राणा यांनी केले़  दरम्यान, यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख यांनीही आपले विचार मांडले.

लवकरच जलसाक्षरतेवर अभ्यासक्रम - कुलगुरू जलसाक्षरतेवर लवकरच अभ्यासक्रम तयार करण्यात येईल आणि तो अभ्यासक्रम व्यवस्थापन विषयांमध्ये समावेश करण्यात येईल, असे मत कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले़ त्याशिवाय येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ परिसर, लातूर आणि परभणी उपकेंद्र आणि न्यू मॉडल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. या जलसाक्षरतेमुळे मराठवाडा विभागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट होईल, असा विश्वास डॉ़ उद्धव भोसले यांनी व्यक्त केला़ 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडWaterपाणीRainपाऊसEarthपृथ्वीMarathwadaमराठवाडा