नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत खुप खर्च झाला असून माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सीमा महेश गुपिले असे विवाहितेचे नाव आहे़ सीमा यांचे ८ मे २०१६ रोजी महेश गुपिले यांच्यासोबत लग्न झाले होते़ सुरुवातीचे काही महिने सासरच्या मंडळींनी चांगले वागविले़ परंतु महापालिकेच्या निवडणुकीनंतर घरच्या मंडळींनी निवडणुकीत खुप खर्च झाला आहे असे म्हणून माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याची मागणी केली़ तसेच मागणी मान्य होत नसल्याने विवाहितेला मारहाण करुन घराबाहेर हाकलण्यात आले़याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन महेश जनार्धन गुपिले, जनार्धन एकनाथ गुपिले, बेबी गुपिले, तृप्ती संगमेश कलवले, संगमेश भारत कलवले, सुनील अंबुलगेकर, सुशिलाबाई सोमवारे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.या प्रकरणाचा तपास सपोउपनि पंदलवाड हे करीत आहेत़ आरोपींना अटक झाली असून, पोलिसांचा तपास सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीत खर्च झाल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:36 IST
महापालिकेच्या निवडणुकीत खुप खर्च झाला असून माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
निवडणुकीत खर्च झाल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
ठळक मुद्देसात जणांविरुद्ध गुन्हा : माहेराहून पाच लाख आणण्यासाठी छळ