मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं

By प्रसाद आर्वीकर | Updated: July 14, 2023 20:12 IST2023-07-14T20:11:32+5:302023-07-14T20:12:33+5:30

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा त्यात हा खून असल्याचे निदर्शनास आले.

Drunken husband's troubles increased; His wife strangled him forever | मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं

मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं

नांदेड : दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या पतीला कंटाळलेल्या पत्नीने गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना मुदखेड शहरातील नवी आबादी भागात घडली आहे. मारुती नामदेव वाघमारे (३९) असे मयत पतीचे नाव आहे.

४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नवी आबादी भागात मारुती नामदेव वाघमारे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा त्यात वेगळे काही असल्याचे निदर्शनास आले. तपासाअंती पत्नीनेच पतीचा खून केल्याचे समोर आले. त्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक कमल विश्वनाथ शिंदे यांनी तक्रार दिली. त्यावरून आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दाखल तक्रारी नुसार मारुती नामदेव वाघमारे याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असे. याचा पत्नीला राग आला होता. त्यातूनच ४ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रुक्मिनाबाई मारुती वाघमारे यांनी त्यांचा पती मारुती वाघमारे हा दारूचा नशेत असताना त्याला अंगणात ढकलून दिले आणि त्याच्या गळ्यातील रुमाल आवळून त्याचा खून केला. या तक्रारीवरून आरोपी पत्नी रुक्मिनाबाई मारुती वाघमारे हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सप्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी पत्नी रुक्मिनाबाई वाघमारे यांना अटक केली असून, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Drunken husband's troubles increased; His wife strangled him forever