शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

नांदेडमध्ये मद्यपींची रस्त्यावरच रंगतेय ओली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 7:47 PM

ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच चढते भिंगरीची झिंग

ठळक मुद्देसर्वसामान्य नांदेडकर त्रस्त पोलिसांचेही होतेय दुर्लक्ष

नांदेड : शहरात असलेल्या वाईनशॉप आणि बिअर शॉपी परिसरातील रस्ते, मोकळ्या जागा आणि फुटपाथवरच राजरोसपणे मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत़ त्यातच भाग्यनगर आणि शिवाजीनगर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच बिनदिक्कतपणे मद्यपी आपले बस्तान मांडून बसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ त्यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे़ 

नांदेड शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यावर ठिकठिकाणी वाईन शॉप, देशी दारू दुकानांसह बिअर शॉपी आहेत़ जळपास सर्वच दारू दुकानांसमोर मद्यपींना भल्या पहाटेपासून झिंग चढत असल्याचे दिसून येत आहे़ सकाळी आठ वाजेपासूनच दारुच्या दुकानांसमोर मद्यपींची गर्दी पहायला मिळते़ तरोडा नाका भागात मालेगाव रस्ता, राज कॉर्नर येथे भाग्यनगर ठाण्याच्या परिसरात तसेच शेतकरी पुतळ्याच्या मागील बाजूस जंगमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानांसमोर खुलेआम मद्य सेवन करताना मद्यपी आढळून येतात़ त्याचबरोबर शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, फुले मार्केट परिसरातही असेच चित्र पहायला मिळत आहे़ शिवाजीनगर येथून गोकुळनगर पोलीस चौकीकडे जााणाऱ्या रस्त्यासह नाना-नानी पार्क परिसरात ठिकठिकाणी मद्यपी राजसरोसपणे आपले बस्तान मांडून बसलेले असतात़ तर फुले मार्केट येथील चौक ते पोलीस ठाण्यापर्यंतचा फुटपाथवर ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर पोलिसांनाही न घाबरता पाणी पिल्यासारखे दारू पितांना मद्यपी दिसतात़ 

मद्यपींना ग्लासासह स्नॅक्सचीदेखील व्यवस्था वाईन शॉप चालकांकडून केली जात आहे़ त्यांना देशी दारू असो की इतर विदेशी मद्य घेतल्यानंतर ग्लास, खरमुरे इतर कोल्ड ड्रींकदेखील दुकानदार उपलब्ध करून देत आहेत़ मद्यपींना जागेवरच सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने रस्त्यावर दारू पिणाऱ्यांचेदेखील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे़ 

सामान्यांसह महिलांचीही होते कुचंबणाशहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती चौक, आनंदनगर चौक , मयूर मंगल कार्यालय परिसर, वाय पार्इंट, फुले मार्केट, पूर्णा रस्त्यावरील मोकळ्या जागा, कॅनॉल रस्ता, चैतन्यनगर रस्ता आदी ठिकाणी खुलेआम मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात़  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना त्रास सहन करावा लागत आहे़ मद्यपीकडून भर रस्त्यावर लघुशंका केली जाते़ त्यामुळे परिसरातील महिलांची कुचंबणा होते़ तर अनेक ठिकाणी दारूच्या नशेत वाद घालून हाणामाऱ्याही होतात़ आनंदनगर ते शोभानगर या रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे़ आनंदनगर चौकातून शोभानगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपीसमोर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रस्त्यावरच वाहने उभी करुन फुटपाथवर मद्यपी आपले दुकान थाटत असतात. दारुच्या नशेत अनेकवेळा हाणामारीच्या घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांत भीती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदा