धर्माबादेत तूर, हरभरा खरेदीत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:30 AM2019-02-27T00:30:49+5:302019-02-27T00:31:18+5:30

हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़

Dharmabadeet Tur, Gherabra Buy Practices | धर्माबादेत तूर, हरभरा खरेदीत गैरव्यवहार

धर्माबादेत तूर, हरभरा खरेदीत गैरव्यवहार

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : बाजार समितीतील प्रकार

नांदेड : हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकाराची चर्चा होती़
अनिल नागना तोंडाकूर, सोमनाथ वैजनाथ बेंद्रे रा़रत्नाळी, राजेश बाबूदा जामोदकर व नागेश पोशेट्टी गुरजलवाड या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ २०१७-२०१८ या काळात कमीशनवर विदर्भ को-अ‍ॅप मार्केटींग फेडरेशन नागपूरकडून खरेदी-विक्री संघ धर्माबादसाठी सरकारच्या हमीभावाने तूर आणि हरभºयाची खरेदी करण्यात आली होती़ आरोपींनी खरेदी केलेल्या धान्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड केली़
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील उतराई कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन टोकनमध्ये खाडाखोड करुन खरेदी केलेली तूर व हरभºयाची वाढ दाखविली़ त्यात तूर १११ क्विंटल ५० किलो प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपये प्रमाणे ६ लाख २ हजार रुपये व हरभरा ६१ क्विंटल प्रति क्विंटल ४ हजार ४०० रुपये याप्रमाणे २ लाख ६८ हजार रुपये असा एकुण ८ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केला़ धान्याच्या खरेदीची तपासणी केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला़ या प्रकरणात शाम राजाराम संगेवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Web Title: Dharmabadeet Tur, Gherabra Buy Practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.