हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:32 IST2025-06-16T16:31:50+5:302025-06-16T16:32:31+5:30

गोदापात्र धोकादायक असून, येथे पोहण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरतात.

Devotees from Hyderabad went by boat in Godavari and went swimming in the middle of the basin, 5 people drowned | हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी

हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी

धर्माबाद (जि. नांदेड) : धर्माबादपासूनजवळच असलेल्या तेलंगणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बासर येथे दर्शनासाठी आलेल्या पाच भाविकांचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना १५ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या चिंतल बाजार येथील १८ भाविक बासर येथे श्री सरस्वती मातेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने राकेश (वय १७), विनोद (वय १८), मदन (वय १८), ऋतिक (वय १७) व भरत (वय १८) या पाच भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश कुमार, सर्कल इन्स्पेक्टर किरण रेड्डी, पोलिस अधिकारी गणेश, जी. गंगासागर आदींनी घटनास्थळी भेट देत स्थानिक मच्छीमाराच्या साह्याने मदतकार्य सुरू केले. बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले परंतु पाचवा युवक भरत काही सापडत नव्हता. तब्बल तास ते दीड तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह हाती लागला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

निष्काळजीपणा जीवावर बेतला
हैदराबाद येथील १८ भाविक वाहनाने बासर येथे दर्शनासाठी रविवारी सकाळी दाखल झाले होते. दरम्यान, गंगास्नान करण्यासाठी ते गोदातटावर आले. बोटमध्ये बसून ते सर्वजण नदीपात्रात गेले. मध्यभागी गेल्यावर पाच ते सहा जणांनी पोहण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाचजणांना जलसमाधी मिळाली. गोदापात्र धोकादायक असून, येथे पोहण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरतात. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी बोटचालकांना तंबी दिली होती. त्याउपरही आजची घटना घडली असून या भाविकांना घेऊन गेलेल्या बोटचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Devotees from Hyderabad went by boat in Godavari and went swimming in the middle of the basin, 5 people drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.