शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

ग्रामीण भागातील रस्त्यांचे उजळणार भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:43 PM

जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६४ कोटी २० लाख रुपये किमतीच्या या कामांना लवकरच मुहूर्त मिळणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना ५१ रस्ते कामांसाठी ६४ कोटींचा निधी मंजूर, १२४ किमीची दर्जोन्नती

विशाल सोनटक्के ।नांदेड : जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६४ कोटी २० लाख रुपये किमतीच्या या कामांना लवकरच मुहूर्त मिळणार आहे.मराठवाड्यातील १०८४ किमीच्या कामांना केंद्रस्तरावर मंजुरी मिळाली असून एकूण २३४८ कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद, जळगाव, नांदेड, तुळजापूर ते नांदेड, वारंगाफाटा यासह इतर महामार्गांची कामे मार्गी लागत आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत होती. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात नांदेड जिल्ह्यातील ५१ रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.यात नांदेड तालुक्यातील नांदेड ते पावडेवाडी (लांबी २.६), प्रमुख जिल्हा मार्ग २२ ते आलेगाव (लांबी १.६), प्रमुख राज्य मार्ग ६ ते मुजामपेठ (लांबी १ कि.मी.), राज्य मार्ग २५६ ते बाभूळगाव (लांबी ०.७), प्रमुख जिल्हा मार्ग २८ ते गंगाबेट (लांबी १.६), ग्रामीण मार्ग ४० ते इंजेगाव (लांबी १.२), या सहा रस्तेकामाचा समावेश आहे. धर्माबाद तालुक्यातील तीन कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. यात राज्य मार्ग २५१ ते आटाळा (लांबी २.५७), राज्य मार्ग २६० ते समराळा (लांबी ३.४), प्रमुख जिल्हा मार्ग ८३ ते पाटोदा खुर्द (लांबी ३.३४) या रस्त्यांचा समावेश आहे. तर माहूर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६ ते शिवूर (लांबी ३ कि.मी.), राज्य मार्ग २६५ ते पापनवाडी (लांबी १.३३), राज्य मार्ग- २६५ ते हिवळणी (लांबी ०.९६), प्रमुख जिल्हामार्ग ५ ते पोवनाळा वरचे (लांबी ५ कि.मी.) आणि राज्य मार्ग २६५ ते जगूनाईक तांडा (लांबी ०.७०) या पाच कामांचा समावेश आहे.मुदखेड तालुक्यातील राज्य मार्ग २६१ ते वाडी मुख्त्यार (लांबी ३), प्रमुख जिल्हा मार्ग ते राजवाडी (लांबी ३.५) आणि लिंकरुट ०.४ ते पिंपळकौठा (लांबी १.५). या कामांना मान्यता देण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यात प्रमुख राज्य मार्ग १० ते पारवा खुर्द (लांबी १ कि.मी.), प्रमुख राज्य मार्ग १० ते पोटा तांडा (लांबी ५), प्रमुख राज्यमार्ग १० ते वडगाव जिरोणा (लांबी ४.५), राज्य मार्ग २६३ ते रमणवाडी चिंचोडी (लांबी ३ कि.मी.) या कामांचा समावेश आहे.किनवट तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग १० ते मार्लागुडा- कंचोली- अंदबोरी- मळकजांब (लांबी ११.२२), प्रमुख राज्य मार्ग १० ते नंदगाव कुपटी (लांबी ६.५). इतर जिल्हा मार्ग १२ ते गोंडेमहागाव (लांबी २.५), राज्य मार्ग २६५ ते कुपटी बु. (लांबी ०.५), राज्य मार्ग २६५ ते तलारी तांडा (लांबी ०.५), प्रमुख राज्य मार्ग १० ते बुरकुलवाडी (लांबी ०.५), इतर जिल्हा मार्ग १२ ते मारलगुडा तांडा (लांबी ०.५), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते पांढरा (लांबी १), राज्य मार्ग २६७ ते लोणी (लांबी ०.५), प्रमुख राज्य मार्ग १० ते सिरमिती (लांबी १.५), राज्य मार्ग २६८ ते देवलाई नाईक तांडा (लांबी १.७), प्रमुख जिल्हा मार्ग ६ ते डोंगरगाव सिंग (लांबी १.७), प्रमुख जिल्हा मार्ग- ६ ते अंजी (लांबी ०.८), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते बेलोरी (लांबी १ कि.मी.) या १४ कामांचा समावेश आहे.अर्धापूर तालुक्यातील ३ कामांना मंजुरी मिळाली असून यात राज्य मार्ग २२२ ते सेलगाव (लांबी २.५), प्रमुख जिल्हा मार्ग-६ ते पांगरी, कारवाडी (लांबी २.८) आणि राज्य मार्ग २२२ ते खैरगाव (खु) (लांबी १.५) या तीन कामांचा समावेश आहे. हदगाव तालुक्यातील ९ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात राज्य मार्ग २५९ ते नेवरवाडी (लांबी ५), राज्य मार्ग २६३ ते शेट्याची वाडी (लांबी १.२), प्रमुख राज्य मार्ग ६ ते गारगव्हाण (लांबी ५), राज्य मार्ग २६३ ते वायफना (लांबी ३.७), राज्य मार्ग १५१ ते हडसणी (लांबी १.८), राज्य मार्ग २६० ते चक्री (लांबी ०.८), प्रमुख जिल्हा मार्ग १३ ते वाकी (लांबी ४ कि.मी.), शिरड ते मटाळा (लांबी २.५), प्रमुख जिल्हा मार्ग ३५ ते बोळसा नं. २ (लांबी १.६),उमरी तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ८३ ते बोरजुनी (लांबी १.९) आणि प्रमुख जिल्हा मार्ग ४० ते हिरडगाव (लांबी १ कि.मी.) या दोन कामांचा समावेश आहे तर भोकर तालुक्यातील राज्य मार्ग २२२ पोवनाळा जांमदरीतांडा (लांबी ५.५) आणि राज्य मार्ग २२२ खडकी (लांबी २.५) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. वरीलप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे दर्जोन्नती करण्यात येणार असल्याने हे रस्ते चकाचक होणार आहेत.निर्देश : ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभ आदेश द्यामुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १२४ कि.मी. च्या ५१ कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून या कामांची अंदाजित रक्कम ६४ कोटी २० लाख ७१ हजार रुपये एवढी आहे. याबरोबरच या कामांच्या पाच वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी ४ कोटी ३२ लाख ७४ हजार रुपयांची अंदाजित रक्कमही ग्रहीत धरण्यात आली आहे. दरम्यान, सदरील रस्त्यांची कामे कुठल्याही परिस्थितीत ई-टेंडरिंग करुनच सुरू करावीत, असे स्पष्ट आदेशही शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूकfundsनिधी