मोबाईलवर बोलत बाईक चालवणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:07 IST2019-01-16T13:04:33+5:302019-01-16T13:07:00+5:30

उमरखेड कडुन येणाऱ्या माहुर-नांदेड या बसला बाईक धडकली.

Death of a youth who ride a bike while talking on mobile | मोबाईलवर बोलत बाईक चालवणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू 

मोबाईलवर बोलत बाईक चालवणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू 

हदगाव (नांदेड ) : उमरेखड रोडवर मोबाईलवर बोलत बाईक चालवणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. बाळू रामचंद्र तंत्रे असे मृत मुलाचे नाव असून ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. 

तालुक्यातील बेलमडळ येथील बाळू रामचंद्र तंत्रे हा आपल्या बाईक (MH 26BM1362) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी उमरेखड रोडवरील पेट्रोल पंपवर गेला होता. पेट्रोल टाकून परत येत असताना बाळूला मोबाईलवर कॉल आला, यामुळे तो मोबाईलवर बोलतच बाईक चालवत होता. याच दरम्यान उमरखेड कडुन येणाऱ्या माहुर-नांदेड या बसला बाईक धडकली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हदगाव ठाण्यात बस चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मोबाईलनेच युवकाचा घात केला असे प्रत्यक्षदर्क्षी सांगत होते. 

Web Title: Death of a youth who ride a bike while talking on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.