बिलोलीमध्ये मांजरा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:21 IST2018-08-22T20:20:51+5:302018-08-22T20:21:24+5:30
तेलंगणा सीमावर्ती भागातील मांजरा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

बिलोलीमध्ये मांजरा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
बिलोली (नांदेड ) : तेलंगणा सीमावर्ती भागातील मांजरा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. मृत तरुणाचे नाव संतोष शिंदे (२७) असे असून तो बिलोली येथील रहिवासी आहे.
पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार, संतोष आज मित्रांसोबत बोधन गेला होता .परत येताना एसगीच्या जुन्या पुलावरून तो नदीत पोहण्यासाठी उतरला. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मरण पावला.
मागच्या दोन दिवसांच्या पाऊसमुळे सध्या नदी वाहत आहे. परिणामी जलसाठा वाढला आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. घटनेचा पंचनामा केला असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.