विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:13 IST2019-01-19T01:12:58+5:302019-01-19T01:13:27+5:30

तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली.

Death of a poisoned woman | विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

देगलूर : तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली.
भायेगाव येथील सुप्रिया पृथ्वीराज पाटील (वय २३) या विवाहितेचा २०१५ साली सोमूर येथील पृथ्वीराज दिगंबर पाटील याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर ५ मे २०१५ पासून पती व सासरच्या अन्य लोकांनी विविध कारणांनी विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सासरच्या लोकांत सुधारणा होईल या उद्देशाने नेहमीचा त्रास विवाहितेने सहन केले. दरम्यान २ जानेवारी रोजी तुला काम नीट करता येत नाही या व अन्य कारणांवरून पती व त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केले व जबरदस्तीने तोंडात विष घातल्याचे पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात या विवाहितेने सांगितले होते.
याप्रकरणी विवाहितेच्या जबाबावरून मरखेल पोलीस ठाण्यात पती व अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील विवाहितेचा उपचारादरम्यान १८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: Death of a poisoned woman