उपोषणकर्त्याचा दसरा तंबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:59 IST2018-10-20T00:59:09+5:302018-10-20T00:59:29+5:30
तालुक्यातील धारजणी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पिकांचे नुकसान करुन मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित वन कर्मचा-यांना निलंबन करावे व झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीकरिता एका शेतक-याने उपविभागीय कार्यालयासमोर १७ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

उपोषणकर्त्याचा दसरा तंबूत
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर: तालुक्यातील धारजणी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पिकांचे नुकसान करुन मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित वन कर्मचा-यांना निलंबन करावे व झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीकरिता एका शेतक-याने उपविभागीय कार्यालयासमोर १७ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
उपोषणाला ३ दिवस झाले तरी वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्यामुळे उपोषणकर्त्याला दसरा सण तंबूतच साजरा करावा लागला.
उपोषणास बसलेले शेतकरी रामदास गणपती लिंगमपल्ले (रा. धारजणी) यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माझ्या मालकीच्या शेतजमिनीत उभे पीक असताना वन विभागाच्या कर्मचा-यांनी जबरदस्ती जेसीबीने खोदकाम करून नाली खोदकाम केले. तसेच वन कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी माझ्या मुलासोबत को-या कागदावर सही कर म्हणून वाद घातला. नाली खोदकामामुळे शेतातील कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले.
त्यानंतर सदर शेताची भूमापन मोजणी कार्यालयामार्फत मोजणी केली असता सदर शेतजमीन शेतकरी रामदास लिंगमपल्ले यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. करण्यात आलेले नाली खोदकाम बुजविण्यासाठी २५ हजार खर्च आला. अशाप्रकारे उभ्या पिकांचे नुकसान व झालेला खर्च मिळून एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. याबाबत येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
- नाली खोदकाम बुजविण्यासाठी २५ हजार खर्च आला. अशाप्रकारे उभ्या पिकांचे नुकसान व झालेला खर्च मिळून एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. याबाबत येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.