शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

By शिवराज बिचेवार | Published: June 17, 2023 6:39 PM

गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकांना आमदार आणि निष्ठावंतांनी पाठ फिरविली होती.

नांदेड : जिल्हा भाजपमध्ये सर्व कारभार मित्रमंडळींकडूनच चालविण्यात येत असल्यामुळे आमदार, पदाधिकारी आणि निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु पार्टी विथ डिफ्रंट असलेल्या भाजप पक्षश्रेष्ठीकडे त्यांचे काही चालत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय नाही. आठ दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. या दौऱ्यात एकमेकांसोबत दिसत असलेल्या या मंडळींनी शाह माघारी फिरताच पुन्हा सवता सुभा मांडला. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी नायगाव तालुक्यातील कुंटूर झालेल्या डबा पार्टीत आला. 

खासदार प्रतापराव चिखलीकरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्याच मतदारसंघातील आमदारांचा डबा मात्र गुल करण्यात आला. गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकांना आमदार आणि निष्ठावंतांनी पाठ फिरविली होती. भाजपत सुरू असलेल्या एककल्ली कार्यक्रमावर जाहीर टीका करण्याची सोय नसली तरी अंतर्गत धुसफूस मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमदारांच्या अनुपस्थितीबाबत प्रवीण दरेकर यांनीही वरिष्ठांना कळवणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर शाह यांच्या दौऱ्यात लोक जमविण्याची जबाबदारी या आमदारांवर देण्यात आली होती, तर दुसरीकडे नांदेडसह इतर जिल्ह्यांतील नेत्यांनाही टार्गेट होते. त्यामुळे सभा स्थळ खचाखच भरले होते. 

या सभेत जिल्ह्यातील भाजपत एकजूट असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु शाह परत जाताच सर्वांनी आपापली तोंडे फिरविली. सध्या भाजपकडून महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आमदार राजेश पवार यांच्या नायगाव मतदारसंघातील कुंटूर येथे डबा पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी बॅनरबाजी करून मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात व्यासपीठावरील बॅनरवरून आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र आणि नाव गायब होते. भाषणात उपस्थितांनी त्यांचा साधा उल्लेख करण्याचेही टाळले. 

विशेष म्हणजे व्यासपीठावर खासदार प्रतापराव चिखलीकर, राजेश कुंटूरकर, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, रुपेश कुंटूरकर ही मंडळी होती. या प्रकारामुळे आमदार पवार समर्थकही बुचकळ्यात पडले. ही डबा पार्टी भाजपची, की केवळ चिखलकरांची? असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे भाजपत उघडपणे पडलेले हे गट-तट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पथ्यावर पडणार, हे मात्र नक्की.

भाजप बदलल्याची निष्ठावंतांची खंतभाजप हा दीर्घ संघर्षातून सत्तेपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या जात होत्या. राज्य पातळीवरील नेते प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत संपर्कात होते. परंतु आता ती परिस्थिती पक्षात राहिली नाही. जिल्ह्यातील एक-दोन नेते म्हणतील तेवढेच पक्षश्रेष्ठी ऐकत आहेत. यामध्ये सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना काडीचीही किंमत राहिली नाही, अशी खंत निष्ठावंतांनी व्यक्त केली.

टॅग्स :NandedनांदेडPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरBJPभाजपाAmit Shahअमित शाह