शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

गैरहजर राहणाऱ्या बारा पोलिसांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:03 AM

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकर्तव्यात कसूर : पोलीस अधीक्षकांचे आदेश

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाºयांना सोलापूर तर काही कर्मचाºयांना सातरा येथे निवडणूक ड्युटीवर पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील कर्मचा-यांसह अन्य शाखेतील जवळपास ४०० कर्मचाºयांचा यामध्ये समावेश होता. या ४०० पैकी २५० पोलीस कर्मचारी सातारा येथे पाठविण्यात आले होते. परंतु त्यातील १२ पोलीस कर्मचाºयांनी निवडणूक बंदोबस्ताला गैरहजेरी लावली. या अनुषंगाने सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नांदेड पोलीस अधीक्षकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सदर प्रकाराची गंभीर दाखल घेतली. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने सदर १२ कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकांस त्यांनी दिल्या. यावरुन लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ (१) नुसार या कर्मचाºयावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कारवाई झालेल्या कर्मचा-यांमध्ये गुलाब आडे (हिमायतनगर), कृष्णा मोतीराम चनोडे (मांडवी), बाबूराव सूर्यवंशी (देगलूर), हुजूरीया (वजिराबाद ठाणे), विजय कोंडजे धुंळगंडे (कंधार), सादिक पठाण (शहर वाहतूक शाखा, नांदेड), मुन्वर हुसेन (शहर वाहतूक शाखा, नांदेड), गोपाळ तोटलवार (शिवाजीनगर), देवानंद मोरे (लिंबगांव), राजू कांबळे (मुखेड) आणि मिलिंद लोणे (विमानतळ) यांचा समावेश आहे.बसवाहकास मारहाणतिकीट काढण्याच्या कारणावरुन बस वाहकास मारहाण केल्याची घटना देगलूर येथे ६ मे रोजी घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूर येथील नई आबादी येथील बसवाहक गजानन हनुमंत हुगेवाड हे कर्तव्यावर असताना प्रवाशांचे तिकीट काढत होते.बसमध्ये प्रवास करणा-या एका प्रवाशाने तिकीट काढण्याच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घातला. या वादात बसवाहक गजानन हुगेवाड यांना आरोपी प्रवाशाने शिवीगाळ करीत थापडबुक्क्याने मारहाण केली. घटनेनंतर मारहाण करणारा प्रवासी तिकीट न काढता पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड