शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

वाळू घाटाच्या लिलावधारकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:41 AM

शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउमरी, नायगाव वाळूघाट ईटीएस मोजणीच्या अहवालामुळे पितळ पडले उघडे

उमरी/नायगाव : शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारकावरही गुन्हे नोंदविण्यात आले.कौडगाव येथील लिलाव धारक लोकडेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दत्तात्रय बापूराव जाधव (रा.नायगाव ता. नायगाव जि. नांदेड), येंडाळा वाळूघाट लिलावधारक ओमकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे (रा. पिंपळकौठा ता. मुदखेड जि. नांदेड) व महाटी वाळू घाटाचे लिलावधारक विष्णू शंकर नारणवार (रा. उमरी दहिगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन लिलावधारकांची नावे आहेत. याप्रकरणी मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी पोलिसात तक्रार दिली.वाळू उत्खननाची परवानगी मिळाल्यावर लिलाव धारकांनी गोदावरी नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करण्यास सुरुवात केली. मात्र परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिकचा वाळू उपसा करण्यात आला. या बाबींची शहानिशा करण्यासाठी शासनाने या तीनही वाळू घाटांच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी साठा केलेल्या वाळूची तपासणी केली व पंचनामा केला. या सर्व वाळूसाठ्याची ६ जून रोजी ईटीएस प्रणालीद्वारे मोजणी करण्यात आली. या ईटीएस मोजणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्याद्वारे वाळू उत्खननाचे पितळ उघडे पडले. कौडगाव वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटावरून ३०९२ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी शासनाने दिली होती.मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारक ज्ञानेश्वर दिगंरब कळसे यांच्याविरुद्ध कुंटूर पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.दरम्यान, उमरी व नायगाव तालुक्यात सर्व रेतीसाठ्याची मोजणी महसूल विभागाने केली आहे. ज्या खाजगी जमिनीच्या गटातून रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. अशा सर्व खाजगी जमीनधारकाविरुद्धही दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. दंडाची रक्कम वसूल न झाल्यास त्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्याची कारवाई उमरी व नायगाव तहसीलदारामार्फत करण्यात येत आहे. खाजगी जमीनधारकांनी रितसर परवानगी घेवून साठे केले आहेत का? त्यांच्याकडे बारकोडयुक्त पावती व रेतीघाट धारकाकडून रेती खरेदी केल्याच्या कायदेशीर पावत्या आहेत का? याची तपासणी केली जाणार जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.परवानगीपेक्षा जास्त वाळूचा उपसा,पर्यावरणाचे भारी नुकसान

  • संबंधित लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा १२ हजार ६१६ .४० ब्रास जास्तीचा वाळू उपसा केला. ज्याची किंमत ५ कोटी २६ लाख ७३ हजार ४७० रुपये एवढी होते.
  • महाटी येथील वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटाच्या लिलाव धारकास शासनाने २८७१ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिली होती. मात्र या लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा ६३६६.४० ब्रास जास्तीच्या वाळूचे उत्खनन केले. ज्याची किंमत २ कोटी ६५ लाख ७९ हजार ७२० रुपये एवढी होते. येंडाळा वाळू घाटाचा लिलाव २२ मे रोजी झाला.
  • सदर लिलाव धारकाला गोदावरी नदीपात्रातून २८६२ ब्रास वाळू उत्खनन करण्याची परवानगी दिली,मात्र संबंधिताने या प्रमाणापेक्षा ११ हजार ९५०.७४ ब्रास एवढ्या जास्तीचे वाळू उत्खनन केले. या वाळूची किंमत ४ कोटी ९८ लाख ९४ हजार ३३९ रुपये एवढी होते. अशाप्रकारे वरील तीनही वाळू घाटांच्या लिलाव धारकांनी एकूण ३० हजार ९३३ .५४ ब्रास एवढ्या वाळूची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. वाळूची चोरी, नियमाचा भंग तसेच पर्यावरणाचे नुकसान केल्याचा आरोप या वाळूघाट धारकांवर करण्यात आला
  • मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी उमरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिनही वाळूघाट लिलाव धारकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन इंद्राळे तपास करीत आहेत.
टॅग्स :NandedनांदेडsandवाळूNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी