शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करा-चव्हाण

By admin | Updated: May 14, 2014 01:15 IST

शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या.

नांदेड : शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे १३ मे रोजी खरीप हंगाम २०१४ ची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी शेतमाल उतरविण्यासाठी एका रॅक पाँईटवर लोड येत असल्याने आणखी २ ते ३ रॅक पाँईट वाढवावेत, असेही म्हटले. पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय बैठका घेवून खरिपाचे नियोजन करावे. तसेच इतर विभागाशी समन्वय साधण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन शेतीविषयक आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. खरीप आढावा बैठकीत खत-बियाणासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबिवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. खरिपासाठी जिल्ह्याला १ लाख ९५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणाची आवश्यकता आहे. महाबीज व एनएसई यांच्याकडून १३४०० क्विंटल, खाजगी कंपन्याकडून ६२ हजार क्विंटल तर शेतकर्‍यांकडील ७२४५२ क्विंटल असे एकूण १ लाख ४७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कापसाच्या अजित-१५५ या वाणाची ४ लाख ९७ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली असून सदर कंपनीकडून ९५ हजार पाकिटे उपलब्ध होणार आहेत. ७ मे पर्यंत २०९८० पाकिटे वितरित केली आहेत. यासाठी वाणाच्या तोडीचे उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असल्यामुळे शेतकर्‍यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर वाणांचा वापर करावा, असे कृषी विभागाने आवाहन केले. खरिपासाठी २ लाख ५४ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून पैकी २ लाख ६ हजार मे.टन खत उपलब्ध होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असल्यामुळे खताचा कोणत्याही प्रकारे तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. याशिवाय यावर्षीपासून केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अभियान स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. यात अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, गळीतधान्य अभियान, कोरडवाहू शेती अभियान तसेच फलोत्पादन अभियानाचा समावेश राहणार आहे. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आमदार वसंतराव चव्हाण, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. हणमंतराव पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, व्यापारी असोसिएशनचे मधुकर मामडे, कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पडवळ यांनी पॉवरपॉईंटद्वारे सर्व योजनांची माहिती दिली. (प्रतिनिधी)