coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 18:34 IST2020-06-12T18:34:27+5:302020-06-12T18:34:52+5:30
शुक्रवारी आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या २३४ झाली आहे़.

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू
नांदेड :जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे़ गुरुवारी मध्यरात्री विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ त्यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता १३ वर पोहचली आहे़ शुक्रवारी आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या २३४ झाली आहे़
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील एका ७४ वर्षीय इसमाला उपचारासाठी विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ ४ जून रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ या रुग्णाचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला़ तर नांदेड शहरातील बरकतपूरा येथील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आला होता़ त्यांचाही रात्री मृत्यू झाला़ नांदेडात कोरोनामुळे मृत्यूची पावलेल्यांची संख्या आता १३ झाली आहे़ तर दुसरीकडे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे़ शुक्रवारी शहराच्या विविध भागात आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत़ त्यामध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे़ त्यामुळे नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे़.