coronavirus : नांदेडमध्ये आणखी तीन बाधित आढळले; रुग्णसंख्या ४१७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 14:15 IST2020-07-04T14:15:00+5:302020-07-04T14:15:16+5:30
बिलोली शहरासह मुखेड तालुक्यात आढळले रुग्ण

coronavirus : नांदेडमध्ये आणखी तीन बाधित आढळले; रुग्णसंख्या ४१७ वर
नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन बाधित आढळले. यामध्ये बिलोली शहरातील गांधीनगर येथील दोन रुग्णांसह मुखेड तालुक्यातील दापका येथील एका ३२ वर्षीय इसमाचा समावेश आहे. या तीन रुग्णामुळे जिल्हयातील बाधितांची एकूण संख्या ४१७ एवढी झाली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा बिलोली येथील स्वॅब तपासणी नमुण्याचे ९ अहवाल प्रात झाले. यातील दोन अहवाल पॉझिटीव्ह आढळले. गांधीनगर परिसरातील आजी आणि नातू बाधित असल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली. दरम्यान शनिवारी सकाळी आणखी सहा नमुण्यांचा अहवाल प्रात्त झाला. यामध्ये मुखेड तालुक्यातील दापका येथील ३२ वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह आढळला.
दरम्यान, जिल्हयातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यातील ३०६ जणांनी शुक्रवारी सकाळपर्यंत कोरोनावर मात केली असून, १८ जणांचा यापूर्वीच उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी ९० स्वॅब नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले असून, यासंदर्भातील अहवाल आज शनिवारी सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत.