coronavirus : नांदेडमध्ये आणखी एका डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:25 IST2020-06-01T11:25:07+5:302020-06-01T11:25:33+5:30

यापूर्वी दोन डॉक्टर आणि एक परिचारिका बाधीत

coronavirus: Three infected with another doctor in Nanded | coronavirus : नांदेडमध्ये आणखी एका डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus : नांदेडमध्ये आणखी एका डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड- नांदेड जिल्ह्यात यापूर्वी दोन डॉक्टर आणि एका परिचरिकेला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या 43 अहवालपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात शहरातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. 

नांदेडमध्ये आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 149 एवढी झाली आहे, तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी देगलूर नाका भागातील एका 45 वर्षीय डॉक्टर चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शिवाजी नगर येथील मोटार वाहन कंपनीतील कामगार आणि मिलत नगर येथील दोघे पॉझिटिव्हआढळून आले आहेत. या तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी मुखेड आणि विवेक नगर येथील दोन डॉक्टर तर एक परिचारिका पॉझिटिव्ह आढळली होती.

Web Title: coronavirus: Three infected with another doctor in Nanded