शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

CoronaVirus : धक्कादायक ! नांदेडमधील कोरोना बाधित पळाले;१६ ताब्यात, चार जणांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 11:24 AM

गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र ते तेथून काही वेळेतच निघून गेले

नांदेड- शनिवारी नांदेड शहरात 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.यातील काही ‘कोरोना’बाधित रुग्ण पळालले होते. शनिवारी रात्रीपर्यंत 16 जणांचा शोध लागला होता. परंतु अद्यापही 4 जण सापडले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

पंजाबहुन परत आलेल्या तीन चालक व एका मदतनीस यास ‘कोरोना’ची बाधा झाल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका खडबडुन जागी झाली आणि श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 97 सेवादारांचे ‘स्वॅब’ चाचणीसाठी घेतले. परंतु त्या सर्वांना अर्धवट माहितीच्या आधारे मोकळे सोडुन देण्यात आले. त्याच 97 पैकी शनिवारी सकाळी 20 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे उघडकीस आले होते.

गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र ते तेथून काही वेळेतच निघून गेले आणि सगळा गोंधळ उडाला यातील 20 पैकी केवळ 16 कोरोनाबाधित व्यक्तींचेच संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती घेण्यात आली होती. तर त्यापैकी चार व्यक्तींची आवश्यक माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘त्या’ वीस कोरोनाबाधित सेवादार रुग्णास शोधण्यासाठी वजिराबाद पोलीस निरीक्षक संदिप शिवले व पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के यांच्या चमुस दिवसभर चांगलीच कसरत करावी लागली. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या व नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा शोध लागत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर सकाळपासून श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात ठाण मांडुन बसले होते. तेव्हा कुठे दुपारपर्यंत अकरा जणांना शोधण्यात यश आले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच कोरोनाबाधित अशा 16 जणांचा शोध लागला बाकी 4 जण अजून गायब आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहेयांपैकी फरार झालेल्या चार ‘कोरोना’बाधितांची अपूर्ण माहिती असल्याने त्यांना शोधता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कुणीही माहिती देण्यास तयार नाही. शनिवारी दिवसभर अहवाल हाती पडताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशावरून गुरुद्वारा परिसरात शोधमोहिम राबवून 16 जणांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवले यांनी सांगितले की, रुग्णाचे पत्ते नीट घेणे हे महापालिकेचे काम आहे, त्यांनी ते व्ययस्थित करायला हवे होते.. त्यामुळेच असे झाले…

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड