coronavirus नांदेड @ ४२३; आणखी सात बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:19 IST2020-07-04T18:18:43+5:302020-07-04T18:19:03+5:30
जिल्ह्यातील ३१० जणांनी कोरोनावर मात केली

coronavirus नांदेड @ ४२३; आणखी सात बाधितांची भर
नांदेड : कोरोना स्वॅब नमुन्यांचे ९० तपासणी अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले. यातील ६८ अहवाल निगेटिव्ह आले तर ७ पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४२३ एवढी झाली आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये शहरातील गणेशनगर येथील ६३ वर्षीय महिला, देगलूर येथील ५७ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर, अशोकनगर येथील प्रत्येकी एक, अनुक्रमे ५० आणि ५४ वर्षीय पुरुष तर विष्णूपुरी येथील ३१ वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले. याबरोबरच मुखेड तालुक्यातील दापका येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथे ३२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला तर लातूर जिल्ह्यातील आंधोरी येथील एका ४९ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३१० जणांनी कोरोनावर मात केली असून १८ जणांचा या पूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.