coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; आणखी नऊ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:26 IST2020-07-08T11:25:28+5:302020-07-08T11:26:00+5:30

रुग्णसंख्या 493 झाली आहे. 

coronavirus: Corona infected woman dies in Nanded | coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; आणखी नऊ बाधितांची भर

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; आणखी नऊ बाधितांची भर

नांदेड- जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला होता तर 26 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. बुधवारी सकाळी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या आता 23 वर पोहचली आहे. तर नव्याने आणखी 9 बाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 493 झाली आहे. 

बुधवारी सकाळी 106 रुग्णांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात नांदेडसह देगलूर, कंधार आणि मुखेड येथील 9 जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तर कंधार तालुक्यातील सोमला तांडा येथील 65 वर्षीय महिलेला 29 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला.

Web Title: coronavirus: Corona infected woman dies in Nanded