Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 11:49 IST2020-05-17T11:49:35+5:302020-05-17T11:49:40+5:30

बारड येथेही आणखी एक पॉझिटिव्ह

Coronavirus: 13 more positive in Nanded; The number of patients is 97 | Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९७ वर

Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९७ वर

नांदेड: जिल्हयातील बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी १८ रुग्णांची भर पडल्यानंतर रविवार ही नांदेडकरांची चिंता वाढविणारा ठरला. रविवार १७ मे रोजी सकाळी प्राप्त नमुन्यांच्या अहवालांपैकी १३ नमुने अहवाल पॉजिटिव्ह आढळून आले आहेत.

यातील  ९ रुग्ण प्रवासी आहेत, एक रुग्ण करबला भागातील आहे , तर दोघे अबचल नगर  येथील रहिवासी आहेत.  दूसरीकडे  बारड येथेही आणखी एक रुग्ण आढळला असून तो बारड येथील शासकीय रूग्णालयात दाखल आहे. दरम्यान, या नव्या १३ रुग्णांमुळे जिल्हयातील एकूण रुग्णांची संख्या ९७ वर जावून पोहंचली आहे.

Web Title: Coronavirus: 13 more positive in Nanded; The number of patients is 97