शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोरोना संकट ; मराठवाड्यातील उद्योगांची कामगारांअभावी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:59 PM

केवळ १५ हजार कामगार, कर्मचारी  उपलब्ध झाल्याने उद्योजकांची मोठी कोंडी झाली आहे.

ठळक मुद्दे२६१६ कंपन्यांना परवानगी ९४ हजार कर्मचाऱ्यांची गरज, उपलब्ध १५ हजार

- विशाल सोनटक्केनांदेड : कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा रुळावर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मात्र, कच्चा मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न असतांनाच आता कर्मचारी, कामगारांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४ हजार ३८४ कारखानदार पुन्हा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. यातील २६१६ कारखान्यांना सुरु करण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे. हे कारखाने सुरु करण्यासाठी ९४ हजार ५१८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, केवळ १५ हजार कामगार, कर्मचारी  उपलब्ध झाल्याने उद्योजकांची मोठी कोंडी झाली आहे.

कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील उद्योगांच्या विकासासाठी जानेवारी महिन्यातच शासनाने नांदेडसह शेंद्रा, जालना आणि उस्मानाबाद येथे नविन औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १६ नवे उद्योग आणण्यासाठीच्या हालचाली सुरु असतांनाच कोरोनाचे संकट उभे राहिल्याने आहे त्या उद्योगांनाही बे्रक बसला. तिसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगाचे चाक पुन्हा फिरावे यासाठी अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरच्या अडचणी  थांबलेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरुन येणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दुसरीकडे परप्रांतियांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने आपले गाव गाठलेले आहे. त्यामुळेच  उद्योग सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात उद्योग सुरु करण्यास अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३ हजार ४९१ औद्योगिक संस्था पुन्हा आपले युनिट सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी या संस्थांनी ४ हजार ३८४ अर्ज उद्योग विभागाकडे दाखल केलेले आहेत. यातील २ हजार ६१६ संस्थांना उद्योग सुरु करण्यासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे. या संस्था पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ९४ हजार ५१८ कामगार, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ १५ हजार कर्मचारीच उपलब्ध झाल्याने मराठवाड्यातील उद्योजकांना कारखाने सुरु करण्यास अडचणी येत आहेत.

1730 गाड्यांची उद्योगांना आवश्यकता08 जिल्ह्यांत २६१६ कारखान्यांना उद्योग सुरु करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने परवाना देण्यात आला आहे. या कारखान्यांकडून मालवाहतूक तसेच इतर कारणांसाठी १७३० गाड्यांची आवश्यकता असून, या गाड्यांसाठी उद्योजकांकडून पासेसची मागणी करण्यात आली होती. 

1147  गाड्यांना पास वितरित करण्यात आले आहेत.1119 पास हे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात वितरीत करण्यात आले असून, बीड-१ , जालना -३, लातूर -९, नांदेड-६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९ पास देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून जास्तीत जास्त उद्योग सुरु व्हावेत यासाठी  प्रयत्न सुरु आहेत. याच हेतूने अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे; परंतु संसर्ग वाढण्याच्या भीतीने कामगार कामावर येण्यास धजावत नसल्याने अनेक कारखान्यांकडे आवश्यकतेएवढे कामगार, कर्मचारी उपलब्ध नाहीत. कच्चा माल, आणि मालवाहतूकीचाही प्रश्न आहे.    - व्यंकट मुद्दे, कार्यकारी अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ, नांदेड

मराठवाड्यातील उद्योगांची  अशी आहे स्थिती

जिल्हा     प्राप्त अर्ज     परवानगी       कर्मचाऱ्यांची     उपलब्ध                    मिळालेले      आवश्यकता     कर्मचारीऔरंगाबाद       ३८१३    २२१२          ८४७०७           १०५८६बीड               १७९      १३२            १९२७             १८७७हिंगोली          १२        ०८              ८९                 ५५जालना           ६९        ०७              ३९३४             ७१लातूर             १३९      १२५            १२२५             १०४४नांदेड             ६१        ५४              १११७             ६१७उस्मानाबाद     ७४        ५५              ११०१             ५८२परभणी          ३७        २३              ४१८               १७४एकूण            ४३८४    २६१६          ९४५१८           १५००६..............................................................................

टॅग्स :Marathwadaमराठवाडाbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबादNandedनांदेड