शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:57 PM

जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़

ठळक मुद्देदुष्काळ परिस्थितीचा प्रधान सचिवांनी घेतला आढावा

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज मुखेड तालुक्यातील मोटरगा, चांडोळा, भगनूरवाडी तसेच आसना नदी व विष्णूपुरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी दुपारी ४़३० वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला़ जिल्ह्यात दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी जलसंधारण व रोजगार हमीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ग्रामीण भागातील पाणीटंचाई भीषण बनली असून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे़सध्या १२१ टँकर जिल्ह्यात सुरू असून सर्वाधिक ५१ टँकर मुखेड व लोहा तालुक्यात २३ टँकर सुरू आहेत़ ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून नवीन ५०७ विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे़ तात्पुरता पाणीपुरवठा योजनेची ६३ कामे हाती घेण्यात आली असून १९३ नळयोजना दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत़ एकूण ६८़२१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी व गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार हमीची १०२१ कामे सुरू करण्यात आली आहेत़ त्यावर १३८६० मजूर काम करत आहेत़ दुष्काळ परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत़ यापूर्वी जलसंधारणावरील रोजगार हमीच्या कामांना तहसील कार्यालय प्रशासकीय मान्यता देण्यात येत होती़ मात्र आता कृषी विभागातच या कामांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत़जिल्ह्यात पशूधन मोठ्या प्रमाणात असले तरी चारा टंचाईचा प्रश्न म्हणावा तेवढा गंभीर नाही़ त्यामुळे केवळ एक-दोन ठिकाणी चारा छावणीचे प्रस्ताव आले आहेत़ छावणीच्या रुपात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे आले पाहिजे, असेही डवले यांनी आवाहन केले़ दरम्यान, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, शेतकरीपुत्र तसेच लोकप्रतिनिधींनी भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले़नांदेड शहरातील पाणीटंचाई गंभीरशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प साठा राहिल्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी प्रशासनाला कडक धोरण राबवावे लागणार आहे़सध्या विष्णुपूरी प्रकल्पात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे़ त्यासाठी महापालिकेने हे पाणी काटकसरीने पुरवठा करण्याची गरज असल्याचे एकनाथ डवले यांनी सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड