नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

By शिवराज बिचेवार | Updated: October 27, 2023 09:20 IST2023-10-27T09:09:42+5:302023-10-27T09:20:26+5:30

मराठा आरक्षणासाठी तरुण आक्रमक झाले असून गावात नेत्यांना प्रवेश बंद केला आहे

Cars of MP Pratap Patil's convoy vandalized | नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

नांदेड: मराठा आरक्षणासाठी गांवबंदी असतानाही आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली, नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील रात्री उशिराची ही घटना आहे. 

खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत  तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Cars of MP Pratap Patil's convoy vandalized