मुलीच्या लग्नाची काळजी; शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:30 IST2020-01-22T16:28:31+5:302020-01-22T16:30:39+5:30

ईश्वर  जाधव कर्जबाजारी झाले होते. यातच त्यांची मुलगीही लग्नाच्या वयाची झाली होती.

Care for the daughter's marriage; Farmer suicide | मुलीच्या लग्नाची काळजी; शेतकऱ्याची आत्महत्या

मुलीच्या लग्नाची काळजी; शेतकऱ्याची आत्महत्या

मांडवी (जि. नांदेड) : लग्नाला आलेल्या मुलीच्या काळजीतून   ईश्वर नूरसिंग जाधव (३८, रा. टेंभी ता. किनवट) या कर्जबाजारी शेतकऱ्याने २१ जानेवारी रोजी सकाळी शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. 

ईश्वर  जाधव कर्जबाजारी झाले होते. यातच त्यांची मुलगीही लग्नाच्या वयाची झाली होती. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकीमुळे ते आर्थिक विवंचतेत होते. एकीकडे कर्ज आणि दुसरीकडे मुलीचे लग्न कसे करावे यातून मार्ग निघत नसल्याने शेवटी त्यांनी आपल्या पाटोदा शिवारातील शेतात आत्महत्या केली. याप्रकरणी मांडवी पोलिसांत भाऊ रमेश नूरसिंग यांनी फिर्याद दिली. 
मयत ईश्वर जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 
 

Web Title: Care for the daughter's marriage; Farmer suicide