चालकाला अंदाज न आल्याने कार पाण्यात; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:35 AM2020-07-16T11:35:25+5:302020-07-16T11:35:44+5:30

पाणी जास्त असल्याने कार ऑटोमॅटिकरित्या लॉक झाली.

Car in water due to driver's unpredictability; No casualties | चालकाला अंदाज न आल्याने कार पाण्यात; जीवितहानी नाही

चालकाला अंदाज न आल्याने कार पाण्यात; जीवितहानी नाही

Next
ठळक मुद्देदरवर्षी या ठिकाणी काही न काही दुर्घटना घडत असते

नांदेड : शहरातील हिंगोली गेटच्या अंडरब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा अंदाज आला नसल्याने एका चालकाने त्यातून कार नेण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून यात जीवितहानी झाली नाही.

पाणी जास्त असल्याने कार ऑटोमॅटिकरित्या लॉक झाली. त्यामुळे काही काळ इथे कार ला जलसमाधी मिळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र काही जागरूक नागरिकांनी तातडीने क्रेनला बोलावून ही कार पाण्याबाहेर काढली. नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, दरवर्षी या ठिकाणी काही न काही दुर्घटना घडत असते, मात्र त्यावर काहीही तोडगा मनपाला काढता आलेला नाही.पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर दरवर्षी हा मार्ग अनेक दिवस बंदच असतो, महापालिकेने या ठिकाणी मार्ग बंद असल्याचे साधे फलकही लावले नव्हते हे विशेष

Web Title: Car in water due to driver's unpredictability; No casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.